रंगांत नाहलेला
दोघांतला दुवा l
नक्षीत गुंतवूनी
ओढ लावी जिवा ll
तिच्या सौंदर्याचे सातही रंग मिरवणारी, वाऱ्यावर उडताना प्रियकराचा जीव टांगणीला लावणारी, मर्यादेचं भान सांभाळत तिचा पेहराव खुलवणारी आणि कधीकधी डोक्यावरचा पदर होऊन परंपरेचा वारसा जपणारी तिची ‘ओढणी’ ही केवळ वेशभूषा नसते. स्वप्नगंधा कलेक्शनमध्ये आहे ‘पैठणी दुपट्टा’ ची मोठी व्हरायटी, ज्यामध्ये विविध आकर्षक रंगांचे कॉम्बिनेशन असलेल्या सुंदर, नक्षीदार ओढण्या तुम्हाला मिळतील. तुमच्या वॉर्डरोबमधल्या देखण्या पंजाबी ड्रेसेसवर हा दुपट्टा तुम्ही घेऊ शकता. सण-समारंभांत खुलून दिसण्यासाठी ट्रॅडिशनल वेअरचा उत्तम पर्याय हा दुपट्टा होऊ शकतो. त्यावरचं नाजूक नक्षीकाम, सोनेरी वेलबुट्टी आणि जरीचे काठ पाहताक्षणी नजरेत भरतात.
हळुवार पावलांनी
निघते जरी पुढे ती l
झुलवी मनास मागे
ओढीत गुंतते ती ll
क्वचितप्रसंगी एखाद्या सिम्पल प्लेन ड्रेसबरोबर असा एखादा रिच दुपट्टा तुमचा अपिअरन्स एकदम खुलवतो. ट्रॅडिशनल आणि त्याचवेळी ट्रेंडी, एथनिक लूक देणारा स्वप्नगंधा पैठणी दुपट्टा हे एक स्पेशल कलेक्शन आहे. पैठणी दुपट्टा हा वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहे.
– Blue with Silver Colour Single Muniya Border
– Pink with Golden Colour Singal Muniya Border
– Golden with Multi Colour beautiful Peacock design
याशिवाय इतर अनेक कॉम्बिनेशन्स उपलब्ध आहेत, जी तुम्ही ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष स्टोअरला भेट देऊन तुमच्यासाठी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना गिफ्ट करण्यासाठी घेऊ शकता. त्याचबरोबर पैठणी अंतरपाट, पैठणी शेला, बाळंतविडा इत्यादी अनेक वस्तू तर आहेतच.