Fashion, Paithani Collection

या राखीपौर्णिमेला बहिणींना ओवाळणी काय देणार?

ऊन सावलीचे खेळ दाखवणारा, रंगांची उधळण करणारा श्रावण येतो, आणि बाजारात सुंदर राख्या दिसायला लागतात. आणि मग यावेळी ओवाळणी म्हणून बहिणींना काय द्यावं यासाठी भाऊरायांची शोधाशोध सुरु होते. आपल्या लाडक्या बहिणीला आवडेल, शोभेल अशी छान भेटवस्तू हवी असेल, तर पुण्यात स्वप्नगंधा कलेक्शन हे खात्रीशीर ठिकाण आहे. इथे अगदी ₹५० पासून पुढे पैठणीच्या सुरेख नक्षीदार वस्तू आणि साड्या मिळतात. या एकाच ठिकाणी राख्यांची आणि ओवाळणीच्या भेटवस्तूंची सगळी खरेदी होऊन जाते. या सगळ्या वस्तूंमध्ये रंग, आकार आणि नक्षीनुसार असंख्य पर्याय उपलब्ध असतात, ज्यामुळे तुमच्या आवडीनुसार भेटवस्तू निवडणं शक्य होतं.

पैठणी राख्या :

स्वप्नगंधा कलेक्शनमध्ये आकर्षक, विविध रंगातल्या आणि आकाराच्या राख्या उपलब्ध आहेत. सहा किंवा अधिक राख्यांची मागणी असल्यास या राख्या आम्ही कुरिअर सर्व्हिसद्वारे परगावीही पाठवतो.

पैठणी ज्वेलरी बॉक्स :


तीन वेगवेगळ्या साईझ मध्ये पैठणी ज्वेलरी बॉक्स उपलब्ध आहे. आतल्या बाजूला काच लावलेली आहे, त्यामुळे दागिने तर ठेवता येतीलच. किंवा तुमच्या इच्छेनुसार ड्राय फ्रुट्स,  चॉकलेट्सही या बॉक्सेसमध्ये ठेवता येतात.

साडी पिन कॉम्बो :


सुंदर पैठणी बांगड्या, नक्षीदार साडीपिन, आणि आकर्षक कानातले अशा तीन वस्तूंचा कॉम्बो उपलब्ध आहे. यातील बांगड्या सर्व sizes मध्ये मिळतात. साडीपिनवर समोरच्या बाजूला देखणी नथ असते. आणि मागच्या बाजूला मोठ्या आकाराची पिन असते, ज्यामुळे ही पिन घट्ट बसते. शिवाय एक सुरेखसा छल्लाही यासोबत तुम्हाला घेता येतो.

याव्यतिरिक्त आकर्षक, नक्षीदार पैठणी ड्रेसेस, पैठणी पर्सेस, पैठणी डायरीज, साडी कव्हर्स, इ. अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ही सगळी खरेदी तुम्ही ऑनलाईनसुद्धा करु शकता. त्यासाठी आमची वेबसाईट, आमचं instagram page जरूर पहा, आणि राखी पौर्णिमेची मनासारखी खरेदी करा.

413 Views

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *