‘पैठणीने जपले एक तन… एक मन…
माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची आरास पदराआडून हसली’
कवयित्री शांता शेळकेंनी त्यांच्या कवितेत पैठणीच्या भावविश्वातील आठवणी लिहिल्या आहेत. अशी हि पैठणी शतकानुशतके प्रत्येक मराठी स्त्रीच्या हृदयाचा ठाव घेत आहे. पैठणीने मन हरखून गेले नाही अशी स्त्री दिसणे अशक्यच!
पैठणीचा उगम इ. स. पूर्व दुसऱ्या शतकात सातवाहन राजांच्या काळापासून सापडतो. पुढे सतराव्या शतकात पेशवाईत पैठणीला उत्तेजन मिळाले. पैठणी खासकरून रेशमी धाग्यापासून हातमागावर तयार केली जाते. हे नाव औरंगाबादजवळील पैठण गावावरून आले आहे. नंतरच्या काळात येवले गाव पैठणीसाठी प्रसिद्ध झाले.
सणासाठी, समारंभासाठी सजणे, नटने हा स्त्रियांचा स्थायीभाव आहे- मग ते वय कोणतेही असो. त्याचे तिला कौतुकही हवे असते. त्यामध्ये दागिने , गजरा याबरोबर पैठणीचे स्थान सगळ्यात वरचे आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीचे स्वप्न आहे- एक तरी पैठणी तिच्याकडे असावी. अर्थात स्त्रीचे सौंदर्य नक्कीच खुलवणारी ती साडी आहे. काळ बदलला, जीन्स आल्या, केशरचना बदलली, कम्प्युटर्स, मोबाईल्स, आले – ऍक्टिवा गाड्या आल्या पण पैठणी आपले अस्तित्व टिकवून आहे. इतर साड्यांप्रमाणे पैठणीचा नवेपणा, चमक वर्षानुवर्षे कमी होत नाही, अशी ही पाहताक्षणीच डोळ्यात भरणारी पैठणी !
लग्नात, सणासुदीच्या वेळी, गौरी गणपतीच्या सणादिवशी पैठणी हवीच. त्याचप्रमाणे नवरात्रात वेगवेगळ्या दिवशी नवनवीन रंगांची पैठणी हवी. दिवाळीला हवीच. कोणत्याही समारंभासाठी, गेट टुगेदरला हवीच.
पैठणी रेशीम व जरीपासून विणली जाते. नैसर्गिक रंगाचा [ झाडे, दगड,काही धातू यापासून तयार केलेले] वापर रेशमी धाग्यावर केला जातो. त्यानंतर चित्रकार जसे चित्र काढतो त्याप्रमाणे विणकर पैठणीची निर्मिती करतात. उभा व आडवा धागा मोजमाप घेऊन गुंफला जातो.
पैठणी पिवळा, जांभळा, मोरपंखी, गुलाबी, पीच, आकाशी, हिरवीगर्द रंगात मिळते. पैठणीला मुख्यत्वे दोन रंग असतात- एक संपूर्ण साडीचा, व दुसरा पदराचा. पूर्वी ती नऊवारी होती – आता ती सहावारी आहे. पैठणी संपूर्ण डिझाईनची असली तरी तिचा पदर व काठ विशेषकरून डिझाईन केले जाते. त्यात लोकप्रिय डिझाइन्स आहेत – मोर, बांगड्या, कमळाचे डिझाईन, फुले, बदामाची आकृती, कोयरी इत्यादी अनेकविध पॅटर्न मिळतात. तसेच संगीत वाद्याचे – तब्बल, सनई चे डिझाईन सुद्धा बनतात.
हॅन्डलूम सिल्क पैठणी दोन प्रकारात मिळते एक पारंपारीक, व दुसरा प्रकार आहे ब्रोकेड पैठणी. पारंपारीक पैठणीचा पदर २८ इंच असतो. ब्रोकेड पैठणीचा पदर ४०इंचापर्यंत असू शकतो. पैठणी प्युअर सिल्क, सेमी सिल्क, कांजीवरम व्हरायटीत उपलब्ध आहे.
आताच्या काळात पैठणीच्या वेगवेगळ्या कुर्ती, मॅक्सिहि नव्या डिझाईनमध्ये मिळतात. ते मॉडर्न पॅटर्नमध्ये आहेत, त्यात, बोटनेक, राऊंड नेकचे, शॉर्ट, लॉन्ग कुर्ती आहेत. क्रॉप टॉप व स्कर्ट कॉम्बिनेशन रंगसंगतीत मोहक दिसतो. नेहमीच्या मटेरिअल्सपेक्षा ही डिझाइन्स नक्कीच लक्षवेधक आहेत. जोडीला पारंपरिक- थोडे फ्युजन केलेली ज्वेलरी तुम्ही वापरू शकता.
थोडक्यात परंपरा व नव्या फॅशनचा यात सुरेख संगम दिसतो. शेल्याच्याही आता व्हरायटी आहेत.तसेच कल्पकतेने पैठणीचे मटेरीअल वापरून पर्सेस, डायरी हि आता गिफ्टसाठी मिळतात. या वस्तू आधुनिक पण डिझाईन व बाह्य आवरण पैठणीचे, तेही विविध रंगात- जे तुम्ही मॅच करू शकता.
स्वप्नगंधा कॉलेकशन तुमच्यासाठी घेऊन आलीये पैठणी चे नवीन रूप, पैठणीचे मटेरियल वापरून पुरुषांसाठी कुर्ते, जॅकेट्स मिळू लागलेत. नबाबी थाटाचा, ऐटदार लांब बाह्यांचा कुर्ता पारंपरिक खंडणी रंगात आता मिळतो. त्याला गोंडे लावले असतात. त्यावर व्यक्ती गळ्यात मोत्यांची माळ व फेटा घालू शकते- शानदार मोजडी या ड्रेसबरोबर हवीच.
थोडक्यात नव्या काळात पैठणीने नवे रूप घेतले आहे. अर्थात डिझाईनचा दिमाख तोच पण रूप नवे! अशी हि पैठणी- संस्कृती जतन करणारी- मनमोहक, स्त्रीचे सौन्दर्य, व पुरुषांचा दिमाख सजविणारी!