स्वप्नगंधा कलेक्शनस सादर करीत आहे- पैठणीसाठी एक रसिक स्त्रियांचे आवडते ठिकाण आहेच- ते आता खास संक्रांतीसाठी सादर करीत आहे – पारंपरिक परंतु आजच्या स्त्रियांना भावणारी काळी पैठणी चंद्रकळा !
मकर संक्रांती – माघी हा १४ जानेवारीस दरवर्षी साजरा केला जाणारा सण आहे. या दिवसी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. येथून पुढे दिवस मोठा होतो.
मकर संक्रांती हा भारतात पुरातन काळापासुन साजरा केला जातो. महाराष्ट्र, गोवा आंध्र प्रदेश येथे हा संक्रांत नावाने , बंगालमध्ये पौष सौन्ग्रती, सुकारांत या नावाने कर्नाटकात, आसाम मध्ये माघ बिहू नावाने साजरा केला जातो. अर्थातच या दिवशी प्रतीकात्मक पद्धतीने तीळ गूळ दिला जातो व देताना ‘तीळ गुळ घ्या , गोड बोला ‘ असे एकमेकांना बोलले जाते . हा दिवस नाती धृढ करण्यासाठी, नवीन नाती जोडण्यासाठी आहे.
सूर्याची पत्नी छाया हि पुराणातील पुरातन कथा कल्पना आहे . त्यासाठी काळ्या , ठिपक्याच्या साडी नेसण्याची पद्धत रूढ झाली. या
साडीला ‘काळी चंद्रकळा’ असेही म्हटले जाते. अर्थात हिवाळ्यामुळेही काळ्या रंगाचे महत्व आहे.
स्वप्नगंधा कलेक्शन हे पैठणी व पैठणी ऍक्सेसरीज साठी नावाजले आहेच – आता त्यांनी खास संक्रांतीच्यासाठी काळ्या पैठणींचे कलेक्शन आणले आहे. त्याबरोबरच काळ्या ऍक्सेसरीज आहेत.
स्वप्नगंधाच्या डिझाइनर टीमने विशेष संशोधन करून हि चंद्रकळेची रेंज आपल्यासाठी आणली आहे.
काळ्या रंगाच्या पैठणीमध्ये येवला पैठणीचे मोहक डिझाइन्स आहेत. त्याचबरोबर प्युअर डिझाइन्स आहेत. यामध्ये खास इरकल सिल्कची एक स्वतंत्र रेंज आहे. यात ब्लॅक व लाल काठाची रेंज आहे. त्याचप्रमाणे ब्लॅक व हिरव्याजर्द काठाची, नयनमनोहर जरीचे काठ असलेली रेंज आहे. विशेषकरून या सणासाठी ब्लॅक व गोल्ड काठाची पैठणीसुद्धा आहे. सुंदर जरीचे काठ काळ्या पैठणीवर एक तितकाच अनोखा समन्वयाचे साधतात.
पैठणी ही साड्यांची राजकन्या समजली जाते -प्रत्येक स्त्रीचे स्वप्न आपल्याकडे एक तरी पैठणी हवीच असे असते.
ऍक्सेसरीज मध्ये पैठणी मटेरिअलच्या खास स्लिंग बॅग्स आहेत, हॅन्ड बॅग्स आहेत तसेच मोबाईल पाउच आहेत. याबरोबरच काळ्या पैठणीची कव्हर असलेले , गोल्डन बॉर्डर असलेली सुबक नोटबुक- मूड मेमरी डायरीही आहे .
स्लिंग बागवर पारंपरिक मोराचे डिझाईन आहे . ह्या ऍक्सेसरीज पैठणीच्या रंगसंगतीत आहेतच, यातुन एक आवडून जाणारी , हृदय जिंकणारे भेटवस्तू हि होऊ शकते.
तर व्हा तैयार संक्रांत साजरी करण्यासाठी – साऱ्या रेंजसाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या- तुम्ही येथे ऑनलाईन खरेदी करू शकता व लगेच पैठणी घरी मागवू शकता !
पुढील नवनवीन कलेक्शन साठी एकच फेसबुक पेजलाही आजच जॉईन व्हा !
तिळगुळ घ्या , स्वप्नगंधाच्या काळ्या पैठणीच्या साथीने गोड बोला !